प्रशासनातील जैन समाजाचा टक्का वाढविण्यासाठी जेएटीएफ तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी

पुणे: प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या (जेएटीएफ) वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून आज पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या जेएटीएफ पुणे हॉस्टेलचे भूमिपूजन झाले.

जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र जेएटीएफ च्या वतीने या हॉस्टेलच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीतो ॲपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, चेअरमन पृथ्वीराज कोठारी, जेएटीएफ ॲपेक्सचे चेअरमन इंदर जैन, जेएटीएफचे अध्यक्ष गौतम जैन,
रेस्ट ऑफ महाराष्ट्र जेएटीएफ चेअरमन रवींद्र सांकला, सचिव विशाल कोठारी, श्रमन आरोग्यंचे रमेश हरन, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, राजेश सांकला, विजयकांत कोठारी, शोभा धारिवाल, राजकुमार चोरडिया, देविचंद जैन, कांतिलाल ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मनीष जैन, डॉ. आश्विन पोरवाल, प्रमोद रांका, सुहास खाभीया, गौरव दुगड, राजकुमार लोढा, नाशिकचे सतीश हिरन, नागपूरचे कैलास गोलेचा हे जेएटीएफ चे नवीन सदस्य झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

रेस्ट ऑफ महाराष्ट्र जेएटीएफ चे चेअरमन रवींद्र सांकला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, सचिव विशाल कोठारी यांनी आभार मानले.

Quotes

“जेएटीएफ च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठं काम करण्याची संधी आहे. आणि पुणे नेहमीच शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे जेएटीएफ चे काम देखील पुण्यात अग्रेसर राहील. अतिशय कमी कालावधीत जेएटीएफ हॉस्टेल चे काम सुरू होत आहे व ते वर्षाच्या आत पूर्ण देखील होणार आहे. याचा मला विशेष आनंद आहे.”

  • इंदर जैन (चेअरमन, जेएटीएफ)

जेएटीएफ मुळे समाजातील हुशार मुलांना प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मिळणार आहे. आणि त्यामाध्यमातून ते देशाची सेवा करणार आहेत. शिक्षण म्हटलं की पुणे शहराचे नाव सर्वात पहिल्यांदा येते. जेएटीएफचे काम देखील शिक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी होत असलेल्या या हॉस्टेलचा अतिशय आनंद आहे. जागतिक दर्जाचे हे हॉस्टेल असेल. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करताना काहीच कमी पडणार नाही याची यामध्ये पुरेपूर काळजी घेतली आहे.

  • गौतम जैन (अध्यक्ष, जेएटीएफ)

“गेल्या काही दिवसात प्रचंड मेहनत घेऊन हॉस्टेलसाठी जागा मिळवली आहे. आता निर्धारित वेळेतच हॉस्टेल चे बांधकाम पूर्ण होईल. दर्जेदार, सर्व सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्टेल मुलांना मिळेल. अभ्यास, चर्चा, मार्गदर्शन, व्यायाम आदी सर्व बाबी विचारात घेऊन हे हॉस्टेल बांधले जाणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशी ही वास्तू असेल.”

  • रवींद्र सांकला (चेअरमन, रेस्ट ऑफ महाराष्ट्र जेएटीएफ)

Leave a Comment