पुणे, आपल्या व्यक्तिमत्वातील दातुत्व, कर्तृत्व आणि दूरदृष्टी या तिन्ही गुणांच्या संगमाने उद्योग विश्वात आदर्श वस्तूपाठ;निर्माण करणारे ज्येष्ठ नितीन देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाने भारावून जात त्यांना सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आज अभिवादन करण्यात आले. निमित्त होते श्री पूना गुजराथी बंधू समाज, दि पूना गुजराथी केळवणी मंडळ आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने;ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याचे
