पंतप्रधानांच्या फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र योगदान देईल-
जयकुमार रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री
पुणेः- व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून पंतप्रधानांनी फाईव्ह ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे जे स्वप्न पाहिले आहे, त्यात महाराष्ट्राचे निदान एक ट्रिलियन योगदान अपेक्षित असून या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र भरीव योगदान देईल, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.