४५१ दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळीशिधा वाटप!

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांचा उपक्रम !

पुणे, द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या नांदेड फाटा,सिंहगड रस्ता येथील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहर आणि जवळच्या परीसरातील दृष्टीबाधित व्यक्तीं आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात ४५१ दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले.

Leave a Comment