एक यशस्वी विद्यार्थी हजारो विद्यार्थ्यांचा प्रेरणास्त्रोत – ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी !

पुणे, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. एका विद्यार्थ्याचे यश इतर हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते, असे मत ज्येष्ठ अभिनेते व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
कै. रघुवीर गोयल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोहन जोशी बोलत होते.

Leave a Comment