चांदवड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन !

चांदवड, येथील आबड कला,लोढा वाणिज्य आणि जैन विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत ‘वाणिज्य मंडळाचे’ उद्घाटन श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य श्री (सीए) अभिजितजी मोदी यांचे हस्ते करण्यात आले.प्राचार्य डॉ.डी.एन.शिंपी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री (सीए) अक्षयजी भंडारी, श्री पिंटूभाऊ संचेती प्रशासकीय अधिकारी श्री पी.पी.गाळणकर,डॉ.जी.एच.जैन,उपस्थित होते.उपप्राचार्य डॉ.डी.ए.दगडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

वाणिज्य विभागप्रमुख डॉ.पी.आर.सोहनी यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.उद्घाटक श्री (सीए) अभिजितजी मोदी यांनी व्यावसायिक शिक्षणात सीए सारख्या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम ,चिकाटी ,जिद्द आणि स्वतः मधील भीती दूर करून विद्यार्थी यशस्वी होण्याबद्दलचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कौशल्याबरोबरच इतर ज्ञानाचीही जोड असली पाहिजे असे नमूद केले.यानंतर श्री पिंटूभाऊ संचेती, श्री (सीए) अक्षयजी भंडारी,श्री पी.पी.गाळणकर,डॉ.जी.एच.जैन, यांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.डी.एन.शिंपी यांनी विद्यार्थ्यांनी दुरदृष्टी ठेवून आजच आपले ध्येय निच्चीत करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण कासार .तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा आहेर या विद्यार्थीने केले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.सी.के.कुदनर,वाणिज्य शाखेचे डॉ.एन.पी.जैन,प्रा.व्ही.आर.कोतवाल,प्रा.पी.बी.पवार प्रा.ए.एम.सोनवणे प्रा.एस.बी.भवर तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर सहकारी आणि वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री बेबीलालजी संचेती,उपाध्यक्ष श्री दिनेशभाऊ लोढा,मानद सचिव श्री जवाहरलालजी आबड ,प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री अजितभाऊ सुराणा,उपाध्यक्ष श्री अरविंदजी भन्साळी तसेच महाविद्यालय विकास समितीचे समन्वयक श्री कांतीलालजी बाफना व सी.ए.श्री महावीरभाऊ पारख यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.

Leave a Comment