पुणे, दरवर्षी प्रमाणे दि पूना मर्चेंटस् चेंचरच्या वतीने सभासद, दिवाणजी, दलाल आणि हमाल कामगारांच्या इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ऐंशी टक्क्यांहून अधिक व पदवी परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या एकूण ४७गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार शनिवार दि. १२ जुलै २०२५ रोजी करिअर मार्गदर्शक मा. श्री. राहुलजी भटेवरा व मा. प्रा. आशिषजी दुबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रायकुमार नहार होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष रायकुमार नहार, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड व माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, राजेश शहा, प्रविण चोरवेले उपस्थित होते.
मा. श्री. राहुलजी भटेवरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ” प्रेरणा घ्या पण प्रभावीत होऊन निर्णय घेऊ नका”. आपल्या आवडीनुसार करिअर निवडणे गरजेचे असून स्वतःला जाणून घेणे म्हणजेच स्वतःची आवड निवड, बलस्थाने समजून घेऊन करिअर निवडावे व एकदा करिअर निवडले की, चॅट जी.पी.टी व गुगलवरुन त्याबाबतची सर्व माहिती मिळवावी. आपल्या करिअर संदर्भात सध्या अनेक सरकारी उपक्रमही आहेत त्याचाही फायदा घ्यावा. मुलांनी त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडले तर त्यांचे भविष्य उज्वल होईल. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आपली आवड कशात आहे हे आपल्या आई-वडीलांशिवाय दूसरा कोणताही सल्लागार सांगू शकणार नाही. क्षेत्र कुठलेही निवडा पण ५ सुत्रांनुसार त्याची अंमलबजावणी करा. काग चेष्ठा जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत प्रयत्न करा, बक ध्यान जे मिळवायचे आहे फक्त त्यावर लक्ष द्या, श्वान निद्रा बेसावध राहू नका, श्वानाप्रमाणे कायम सावध रहा व मेहनतीने यश संपादन करा, असे प्रतिपादन मा. प्रा. आशिषजी दुबे यांनी केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत ईश्वर नहार, पाहुण्यांचा परिचय मुकेश छाजेड व दिनेश मेहता, चेंबरच्या उपक्रमांची माहिती अध्यक्ष रायकुमार नहार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. आभार प्रदर्शन शाम लड्ढा तर सूत्रसंचालन आशिष दुगड यांनी केले. तसेच महानगरपालिकेच्या शिष्यवृत्तीची माहिती माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले यांनी दिली. यावेळी डॉ. संजय कंदलगांवकर, मा. प्रा. योगीनी जोशी, चेंबरचे माजी अध्यक्ष, कार्यकारणी सदस्य संदिप शहा, सुहास दोशी, संजय चोरबेले व ज्येष्ठ व्यापारी जवाहरलाल बोथरा व इतर व्यापारी वर्ग, हमाल पंचायतचे पदाधिकारी तसेच सत्कारार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.