पिंपरी चिंचवड़ जैन महासंघाचे उपाध्यक्ष श्री संतोषजी पोपटलालजी गुगळे यांच्या निवासस्थानी मुक्कामी असलेल्या आष्टा ( भुम ) येथील दिंडीचे महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले ,त्या दिंडी चे प्रमुख वीणेकरी विठ्ठलराव व भोजन सहयोगी श्री.पोपटलालजी व श्री संतोष जी गुगळे यांचा महासंघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला व सुमारे १०० वारकरी बंधु भगिनींना जैन महासंघाच्या वतीने उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. तदनंतर सर्वांनी भजन आणि भोजनाचा आनंद घेतला.

पिंपरी चिंचवड़ महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी सर्वांचे स्वागत केले, संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी महासंघाच्या कार्याची माहिती देऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी जाणार्या वारकर्यांच्या भक्तीभावाला महासंघाच्या वतीने अभिवादन केले .
या समारंभास माजी अध्यक्ष नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा प्रकाश कटारिया,ऊमेश पाटील , महामंत्री संदीप फुलफगर, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा,मंत्री विरेश छाजेड, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत,सहकोषाध्यक्ष तुषार मुथा ,सचिन कोगनाळे, स्नेहल भंडारी ,संजय खाबिया ,मनोज सोळंकी , हर्षल लुंकड, अशोक नहार ,वैभव छाजेड , सुनील गुगळे, गुगळे परिवारातील इतर सदस्य आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.