पुणे, आज मंत्रालयामध्ये मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व व्यापायांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी कौशल्य विकास मंत्री मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांनी विशेष प्रयत्न केले. बैठकीमध्ये मा. पणनमंत्री श्री. जयकुमारजी रावल यांचेसहीत महाराष्ट्रातील अन्य खात्यांचे मुख्य सचिव व अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये बाजार समितीच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीमध्ये मा. उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय बाजार समितीबाबत मा. पणन मंत्री व पणन खात्याचे मुख्य सचिव व अन्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्य प्रश्नांबाबत मा. पणन मंत्री यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार वाढीसाठी व्यापारी प्रतिनिधी व सर्व घटकांना समवेत घेऊन येत्या ३ महिन्यामध्ये सकारत्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच बाजार समितीच्या कर रचनेमध्ये योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असे सांगितले, तसेच व्यवसाय कराबाबत कृती समितीने मांडलेल्या प्रश्नाबाबत बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात आले. जीएसटीच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्राच्या जीएसटीच्या मुख्य आयुक्तांबरोबर चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. मुंबई येथील अन्य प्रश्नांबाबतही मा. श्री. अजितदादा पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.
या बैठकीमध्ये फॅमचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी शहा, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे समन्वयक श्री. राजेंद्र बाठिया, दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष श्री. रायकुमारजी नहार, सचिव श्री. ईश्वर नहार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.
(राजेंद्र बाठिया)
समन्वयक