ऋषी आनंदवनचे कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांचा 63 वा वाढदिवस उत्साहात साजरा !

ऋषी आनंदवनच्या विकासात मोलाचे योगदान !

​हडपसर, पुणे, ऋषी आनंदवनचे कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांचा 63 वा वाढदिवस त्यांच्या परिवारासह आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ऋषी आनंदवन आज आनंदाने बहरले असून, या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​यावेळी संतोष कर्नावट, अभिजीत शहा, मयूर सरनोत, सुमित मुथ्था, ॲड. अभिषेक सरनोत, विजयकुमार मर्लेचा, किशोर छाजेड, गुलाबचंद कवाड, श्याम कर्णावट, प्रवीण तालेडा, संजय कटारिया, प्रकाश गांधी, अशोक कुंकुलोळ, रघुनाथ कसबे, आणि रुपल चोरडिया आदिनी प्रमोद छाजेड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

​याप्रसंगी बोलताना अभिजीत शहा म्हणाले की, प्रमोद छाजेड यांनी आपल्या परिवारापेक्षा जास्त वेळ देऊन ऋषी आनंदवनची सेवा केली आहे. त्यांच्या आणि विजय चोरडिया यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज ऋषी आनंदवनमध्ये नक्षत्र विहार, तीर्थंकर विहार आणि साडेतीनशेहून अधिक बारा ते पंधरा फूट उंचीची देशी झाडे डोलत आहेत. ही झाडे परिसरातील 25-30 किलोमीटरच्या वातावरणात शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवत आहेत, ज्याची किंमत आपण सर्वांनी कोविड काळात अनुभवली आहे. अप्रत्यक्षपणे हे जीवनदान असून, त्याचे श्रेय ऋषी आनंदवनच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देणगीदारांना जाते, असेही ते म्हणाले.

​वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोद छाजेड यांच्या परिवाराने ऋषी आनंदवनला 11,000 रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच, वाढदिवसानिमित्त त्यांना मिळालेली सर्व भेटवस्तू त्यांनी ऋषी आनंदवनला दान केल्या. त्यांच्या या योगदानाबद्दल ऋषी आनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले

Leave a Comment