पुणेकरांचा विशेष पसंतीचा आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीला यावर्षी सुद्धा 25 ते 30 टक्क्याहून वाढून घाऊक बाजारात 12000 ते 14000 प्रतिक्विंटल सुरुवात झाली आहे.गेल्या दोन वर्षात आंबेमोहोर तांदळामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली,भाव वाढीचे प्रमुख कारण नॉन बासमती मध्ये निर्यात व उत्पादन कमी.
महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहर तांदळांपैकी 80 टक्के तांदूळ मध्यप्रदेश मधून तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो.यावर्षी सुद्धा या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे,त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी सुरुवातीलाच आंबेमोहर तांदळाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.