मुंबई येथे झालेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या सर्वसाधारण बैठकीत सन २०२५ ते २०२७ साठी च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये मुंबई येथील जितेंद्र शहा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग दहाव्या वेळी सर्वानुमते बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
