पर्युषण महापर्व जैनांचा सर्वात मोठा धार्मिक सण!

जप, तप साधना , संतवाणी आणि स्वाध्याय यांच्या माध्यमातून हे अष्टदिवशीय पर्व साजरे केले जाते – दुबई येथे डॉ अशोककुमार पगारिया यांचे प्रतिपादन !

दुबई, जैन समाजामध्ये पर्युषण महापर्व हा सर्वात मोठा धार्मिक सण !

या पर्वात जैन साधु साध्वीं च्या प्रवचन वाणीच्या माध्यमातून जिनवाणीचे ,तपस्या चे , साधनेचे महत्त्व सांगितले जाते. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .’या काळात मोठ्या प्रमाणावर तपश्र्चर्या केली जाते नियमितपणे रोज प्रार्थना , प्रवचन,प्रतिक्रमण या माध्यमातून हे पर्व साजरे केले जाते ,हे पर्व अध्यात्मिक दिशा देणारे पर्व ,स्वार्थातून परमार्थ, परिग्रहापासून अपरिग्रह, संसारातून विरक्ती, अध्यात्मा पासून आत्मा आणि आत्म्यापासून परमात्मा अशी साधना करण्यासाठी या पर्वाचे विशेष महत्त्व असते. ज्या ठिकाणी संत साधू साध्वी यांचे चातुर्मास असतात त्या ठिकाणी श्रावक श्राविका जैन स्थानक/ जैन मंदिर यामध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून संतांची वाणी, जिनवाणी श्रवण करत असतात आणि शेवटच्या दिवशी क्षमापर्व, क्षमापना म्हणजेच म्हणजेच आपल्या चुकांबद्दल, आपण दुसऱ्या कोणाचे मन दुखावले असेल त्याबद्दल क्षमा मागण्याचा हा दिवस. पर्युषण महापर्व जप, तप, साधना, संतवाणी ,स्वाध्याय या पंचसुत्रींच्या माध्यमातून है पर्व साजरे केले जाते, असे प्रतिपादन पुणे येथील जेष्ठ समाजसेवी आणि स्वाध्यायी डॉ अशोककुमार पगारिया यांनी दुबई येथील धर्म सभेमध्ये प्रतिपादन केले.

यावर्षी पर्युषण महापर्व आराधना करण्यासाठी स्वाध्यायी म्हणून डॉ पगारिया , शांतीलाल जी फुलफगर आणि ॲड पी एम जैन हे तीन स्वाध्यायी दुबई येथील जैन‌ संघामध्ये जिनवाणीची प्रभावना करण्यासाठी आलेले आहेत. अखिल भारतीय स्वाध्याय संघाच्या वतीने प्रथमच स्वाध्यायी यांना परदेशात म्हणजे दुबई येथे पाठविण्यात आलेले आहे. दुबई या ठिकाणी संघाचे अध्यक्ष युवा उद्योजक श्री धीरज जैन , महिला अध्यक्षा सौ ममताजी जैन आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या ठिकाणच्या जैन समाजातील श्रावक , युवक, युती मोठ्या संख्येने प्रवचन ,प्रतिक्रमण आणि सूत्रवाचन यासाठी सिंधी सेरेमोनियल हाॅल ,मीना बझार येथे उपस्थित होत्या. सूत्र वाचन ॲड पी एम जैन संचेती यांनी केले आणि प्रतिक्रमण शांतीलालजी फुलफगर यांनी केले

Leave a Comment