नैनेश नंदू यांच्या सामाजिक कार्याचा गौरव !

पुणे, गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स क्लबच्या पूर्णत्वासाठी सातत्याने परिश्रम घेऊन, आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे संपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते नैनेश नंदू यांचा समाजाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या क्लबच्या उभारणीत त्यांनी केलेले नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी हे समाजातील ऐक्य आणि प्रगतीसाठी आदर्श ठरले असल्याचे यावेळी उद्योजकनितीन देसाई यांनी सांगितले.

नैनेश नंदू हे केवळ या प्रकल्पापुरतेच मर्यादित नसून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेतात. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली असल्याचे राजेश शहा यांनी म्हटले.

या सन्मान सोहळ्यास उद्योजक नितीन देसाई, राजेश शहा, देवीचंद जैन, वल्लभाई पटेल, हरेश शहा, संदीप शहा, जनक शहा, विनोद देढिया, पंकज देढिया, अनुज गांधी, हेमंत मणियार, हेमाबेन शहा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना, समाजहितासाठी निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींची गरज अधोरेखित केली.

नैनेश नंदू यांचा हा सन्मान हा त्यांच्या निष्ठा, मेहनत आणि समाजसेवेच्या भावनेचा सन्मान असून, भविष्यातही ते अशाच प्रकारे समाजासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Comment