सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ प्रदान

“माझं ध्येय केवळ सुशिक्षित युवक घडवणं नसून एक निरोगी, सुदृढ आणि संस्कारी समाज तयार करणं आहे”

– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष

लंडन / पुणे, ऑगस्ट २०२५:
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये प्रतिष्ठेचा  महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सौ. सुषमा एस. चोरडिया (उपाध्यक्ष व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन), प्रख्यात अभिनेते श्री. सुनील शेट्टी तसेच श्री. राजेंद्र दर्डा (संपादक, लोकमत मीडिया ग्रुप) आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सन्मान डॉ. चोरडिया यांच्या शिक्षण, नाविन्य, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) चे नामांकित माजी विद्यार्थी असलेले प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक व समाजसेवक आहेत. समाजनिर्मितीच्या ध्यासातून आणि ज्ञानाबद्दलच्या जिज्ञासेतून त्यांनी आपली यशस्वी कॉर्पोरेट कारकीर्द सोडून १९९९ साली सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली.

“शिक्षण हे समाजपरिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे” या त्यांच्या ठाम विश्वासातून, डॉ. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यशासाठीच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी घडवण्याचे कार्य केले आहे. त्यांची दृष्टी केवळ वर्गखोल्यांपुरती मर्यादित नसून ते असा समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहेत, जो सुशिक्षित, निरोगी, मूल्याधिष्ठित व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असेल.

१९९९ साली स्थापन झालेले सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आज भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. दोन दशकांहून अधिक काळ उत्कृष्टतेची परंपरा जोपासत, सूर्यदत्त संस्थेत बालवाडीपासून पदव्युत्तर, संशोधन व पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण दिले जाते. याशिवाय व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, डिझाईन, विज्ञान, फार्मसी आणि हेल्थ सायन्सेस अशा विविध शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, सामाजिक उपक्रम आणि जबाबदार जागतिक नागरिक घडविण्याच्या प्रयत्नांसाठी या संस्थेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. “Enlightening and Enriching the Society through Education” या ब्रीदवाक्यानुसार सूर्यदत्त संस्थेने शिक्षण, मूल्ये आणि जीवनकौशल्य यांचा संगम साधत समाजाला उजळविण्याचे व समृद्ध करण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

या विशेष सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले: “हा पुरस्कार केवळ माझा व्यक्तिगत सन्मान नसून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या दृष्टीकोन आणि ध्येयाची दखल आहे. शिक्षण हे फक्त पदवीपुरते मर्यादित नसून व्यक्ती आणि समाज घडविण्याचं खरं सामर्थ्य आहे. माझं ध्येय केवळ सुशिक्षित युवक तयार करणं नाही, तर एक निरोगी, मूल्याधिष्ठित, आणि संस्कारी समाज घडवणं आहे, जो राष्ट्रीय विकासात मोलाचं योगदान देईल.”

या गौरवाबद्दल आनंद व्यक्त करताना सौ. सुषमा एस. चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन म्हणाल्या : “हा सन्मान आमच्यासाठी अभिमानास्पद असून प्रेरणादायी आहे. डॉ. चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली सूर्यदत्त गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जबाबदार जागतिक नागरिक घडवत आहे. या प्रवासाचा भाग असलेल्या आयोजक, मान्यवर व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार.”

Leave a Comment