फोटो
श्रेयांस डुंगरवाल पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल ( सीए) परीक्षा उत्तीर्ण लातूर येथील श्रेयांस ललिता – राजेश डुंगरवाल याने नोव्हेंबर -2024 मध्ये सीएच्या अंतिम परीक्षेचे दोन्ही ग्रुप दिले होते.नुकत्याच लागलेल्या निकालात तो पहील्याच प्रयत्नात कठोर मेहनत,चिकाटीच्या बळावर अवघ्या 22 व्या वर्षी उत्तीर्ण झाला आहे
जैन समाजाने वडिलकीच्या नात्याने जपले : माधुरी मिसाळ
माधुरी मिसाळ व ललीत गांधी यांचा सकल जैन संघ पुणे च्या वतीने जाहीर सत्कार पुणेः माझ्या राजकीय कारकीर्दीत सुरुवातीपासूनच जैन समाजाने मला पाठिंबा दिला आहे. माझी निवडणूक ही त्यांचीच निवडणूक असते. माझ्या या वाटचालीत त्यांनी कायम मला वडिलकीच्या नात्याने जपले आहे. माझी काळजी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे नाते कौटुंबिक स्वरुपाचे आहे. मंत्री झाल्यानंतरचा … Read more
क्रोधावर विजय ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली – गोविंद ढोलकिया, राज्यसभा खासदार पुणे, क्रोध, काम आणि लोभ हे दुर्गण व्यापाऱ्यांसाठी घातक असून क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी व्यक्त केले.दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आयोजित “आदर्श व्यापारी … Read more
अध्यात्मिक आणि प्रेरणात्मक वक्त्या जया किशोरी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४ अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा समतोल जीवन सुसह्य करेल : जया किशोरी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरणात्मक वक्त्या जया किशोरी यांना “सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४ ” ने गौरविण्यात आले . अध्यात्म आणि प्रेरणा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी आणि उत्तम वक्त्या म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . पुणे इथे आयोजित सोहळ्यात प्रा डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन , स्नेहल नवलखा सहयोगी उपाध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यांच्या हस्ते जया किशोरी यांना सन्मानित करण्यात आले . ट्रॉफी , सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनोलॉजी च्या विद्यार्थीर्नींनी बनविलेला विशेष स्कार्फ , गोल्ड मेडल आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी त्यांना संस्थेची संपूर्ण माहिती देण्यात आली . पुरस्कार स्वीकारल्यानंतर जया किशोरी म्हणाल्या , सूर्यदत्तचा २५ वर्षाचा प्रवास प्रेरणादायी आहे . विविध ज्ञानशाखा सोबत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले जाते हे महत्वाचे आहे . या अगोदर ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या यादीमध्ये माझे नाव आहे हे अभिमानास्पद आहे . आज युवकांना आध्यत्मिकतेची सर्वात जास्त गरज आहे . भौतिकवादी जगण्याला अध्यात्मिकतेची जोड दिले तर जीवन सुसह्य होईल . शिकत राहणे हा परिवर्तनाचा नियम आहे . प्रा डॉ संजय बी चोरडिया म्हणाले , जया किशोरी या एक भारतीय आध्यात्मिक वक्त्या, गायिका, प्रेरक वक्त्या, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारक आहेत ज्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘किशोरी जी’ आणि ‘आधुनिक युगातील मीरा’ म्हणून ओळखले जाते. सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार आणि लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स च्या निमित्ताने प्रख्यात व्यक्तिमत्त्वांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली जाते . उत्कृष्टता हे सूर्यदत्त समूहाचे वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या अडीच दशकांच्या प्रवासात आणि 2003 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांनी सातत्यासह वैशिष्ठयपूर्ण उंची गाठली आहे . शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , अध्यात्मिक , औदयोगिक , वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात ज्यांच्या अमूल्य योगदानामुळे परिवर्तन घडून आले आहे अशा व्यक्तिमत्वाना हा पुरस्कार प्रदान केला जातो . विद्यार्थी , पालक आणि समाजाच्या दृष्टीने हा सन्मान प्रेरणादायी ठरतो . आजवर पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंजन, योगाचार्य पद्मभूषण डॉ. बी.के.एस. अय्यंगार, प्रख्यात अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर, पद्मभूषण शिव नाडर, किरण बेदी, पद्मविभूषण मोहन धारिया ,पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर , पद्मभूषण डॉ.विजय भटकर, अध्यात्मिक आणि प्रेरक वक्ता गौर गोपाल दास आदीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
उच्छिल येथे शोभा विज्ञान
उच्छिल येथे शोभा विज्ञान प्रयोगशाळेचे भव्य उद्घाटन संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या माजी अध्यक्षा व हॅपी स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल चोरडिया यांच्या माध्यमातून सौ.शोभा मुथ्या यांच्या दातृत्वातून भव्य विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याकरीता त्याचे पुत्र व उद्योजक श्री.प्रशांत … Read more
सारा संसार एक पुस्तक है
एक बहुत खूबसुरत बाग था। बीच में बड़ा-सा फव्वारा, चारों तरफ कालीन की तरह बिछी हरी घास और क्यारियों में रंग-बिरंगे फूल झूम रहे थे। लोग सुबह-शाम बाग को देखने-घूमने आते। वहाँ इतनी भीड़ रहती कि बेंचो पर जगह ही नहीं मिलती। कुछ लोग तो नियमित सैर के लिए आते थे। इनमें एक युवक भी … Read more