बिबवेवाडी जैन स्थानकात भगवान महावीर स्वामी जन्म महोत्सव उत्साहात साजरा !

 

पुणे, बिबवेवाडी जैन स्थानकामध्ये भगवान महावीर स्वामींचा जन्म महोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी युवा तपस्वी परम पूज्य श्री मुकेश मुनिजी म.सा. यांनी भाविकांना प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की –

“भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि क्षमा यांचा संदेश आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाच्या ç मार्गदर्शक ठरू शकतो. खरी प्रगती ही धनसंपत्तीने नव्हे तर चारित्र्य, करुणा व सद्गुणांनी होते.

तसेच परम पूज्य श्री हरिशमुनिजी म.सा. यांनी आपल्या उद्बोधनात सेवा धर्माचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की

“सेवा ही केवळ बाह्य कृती नसून  आत्म्याची शुद्धी आहे. सेवेमुळे समाजात बंधुभाव वाढतो आणि आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होतो. नि:स्वार्थ, शुद्ध व करुणाभावाने केलेली सेवा हीच खऱ्या धर्माची खरी साधना आहे.”

कार्यक्रमात सन २०२५ च्या चातुर्मासात विशेष योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा मालशाल व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. 

यावेळी सत्य साधना मंडळ, श्रुत बहू मंडळ व तिलोक आनंद पाठशाळा यांच्या सदस्यांनी आकर्षक धार्मिक प्रस्तुती सादर केली.

संघाचे अध्यक्ष श्री पोपटलाल ओस्तवाल यांनी बिबवेवाडी श्री संघाच्या विविध कार्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष श्री माणिक दुगड यांनी केले.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री पोपटलाल ओस्तवाल, श्री माणिक दुगड, श्री गणेश ओसवाल, श्री सुनिल बलाई, श्री चंद्रकांत लुंकड, श्री पन्नालालजी पितळीया, श्री प्रवीण चोरबोले, श्री कीर्तिराज दुगड, श्री संपत भटेवरा, श्री रामलाल संचेती तसेच वर्धमान युथ ग्रुपचे सदस्य यांनी बहुमोल योगदान दिले.

Leave a Comment