भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री शांतिलाल मुथ्था , संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती तसेच श्री चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.