कोल्हापूरमध्ये महा सिक्युरटेक एक्स्पो २०२५ यशस्वी !

४० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा सहभाग, १,००० पेक्षा अधिक अभ्यागतांची उपस्थिती !

कोल्हापूर, इशा डिजिटल चे एमडी श्री राहुल मुथा यांच्या वतीने आयोजित महा सिक्युरटेक एक्स्पो – दक्षिण महाराष्ट्र (दुसरी आवृत्ती) दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी रामकृष्ण लॉन अँड हॉल, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे यशस्वीपणे पार पडला. दक्षिण महाराष्ट्रातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा क्षेत्रासाठी हा एक्स्पो एक महत्त्वपूर्ण मंच ठरला.
या एक्स्पोमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इचलकरंजी, सोलापूर, उरण इस्लामपूर, कोकण विभाग, गोवा तसेच इतर टियर-३ शहरांमधील सिस्टीम इंटिग्रेटर्स, वितरक आणि चॅनल पार्टनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Leave a Comment