विजय भंडारी व इंदर जैन यांचा सन्मान सोहळा संपन्न

जीतो पुणे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणेः जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी विजय भंडारी तर, जेएटीएफ जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी इंदर जैन यांची निवड झाल्याबद्दल जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय भंडारी यांच्या रुपाने मिळाले आहे. तसेच, जीतो ऐडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अर्थात जेएटीएफ चे अध्यक्षपदही पहिल्यांदाच इंदर जैन यांच्या रुपाने पुण्याला मिळाले आहे.

विजय भंडारी व इंदर जैन यांचा हा सन्मान सोहळा कोरेगाव पार्क येथील हॉटेल कोनरॅड येथे आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळ्यास सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एडव्होकेट. एस. के. जैन, जीतो अपैक्सचे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, सकल जैन संघचे विजयकांत कोठारी, लायन्स क्लबचे द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष अचल जैन, ओमप्रकाश रांका, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रविराज ग्रुपचे रवींद्र सांकला, लायन्स क्लबचे राज मुच्छाल, जीतो अपैक्सच्या संचालक प्रियांका परमार, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, जीतो पुणेचे उपाध्यक्ष चेतन भंडारी, सकल जैन संघ पुणेचे विलास राठोड, सिद्धी फाउंडेशनचे प्रमुख मनोज छाजेड, युगल धर्म संघाचे मंगेश कटारिया, दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजीव पाटील, जीतो पुणेचे जिनेंद्र लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीतो पुणेचे माजी मुख्य सचिव पंकज कर्नावट व मुग्धा करंदीकर यांनी केले. यावेळी जीतो अपैक्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व जीतो अपैक्स जेएटीएफ चे अध्यक्ष इंदर जैन यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, उपस्थित मान्यवरांनी विजय भंडारी व इंदर जैन यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवरांनी देखील भावना व्यक्त केल्या.

कोट्स

“जीतो अपैक्सच्याअध्यक्षपदी नियुक्ती होणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत जीतो, लायन्स, युगल धर्म संघ आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून मी जे काम करू शकलो त्यामागे माझे सर्व सहकारी, मित्र, परिवार आणि गुरुंचे पाठबळ आहे. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुमच्या प्रती मी सदैव कृतज्ञ राहील. यापुढच्या काळात अधिक समाजोपयोगी कार्य करायचे आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. माझ्यासह इंदर जैन यांनाही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी संधी मिळाली आहे. तेदेखील उत्तम काम करतील हा विश्वास आहे. येणाऱ्या काळात देशात प्रत्येक 10 अधिकाऱ्यांच्या मागे 1 जैन अधिकारी असेल असे लक्ष ठेवून आपल्याला काम करायचे आहे. याबरोबरच उद्योग व व्यापारात संपूर्ण जगभर नेटवर्क उभारण्याचे लक्ष असून जैन समाज उद्योग व व्यापारात अग्रेसर राहील यासाठी जीतो महत्वाची भूमिका बजावेल. प्रवीणऋषी म.सा. माझी आई, पत्नी भारती, भाऊ चेतन आणि संपूर्ण परिवाराची मला मोठी साथ मिळाली. कुटुंबाची साथ मिळाली तर, माझ्यासारखे अनेक विजय भंडारी तयारी होतील.”

विजय भंडारी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अपैक्स )

“जैन समाज हा अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे राजकारणात आपण फारसे यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, प्रशासनात आपली अनेक गुणवान मुले काम करू शकतील. या भावनेने जेएटीएफ ची स्थापना झाली. गेल्या १२ वर्षांपूर्वी आपण हे स्वप्न पाहिले आणि ते तेव्हापासून वास्तवात येऊ लागले. आता भारतीय प्रशासन सेवेत आपली अनेक मुले देशसेवा करीत आहेत. मी दिल्लीचा असलो तरी, पुणेकरांनी मला आता स्वीकारले आहे आणि मी आता पुणेकर झालो आहे. पुणेकरांनी जे प्रेम आजपर्यंत दिले आहे. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. येणाऱ्या काळात अधिक समाजोपयोगी काम आपल्याला करायचे आहे. ते आपण सर्व मिळून करू.”

इंदर जैन (राष्ट्रीय अध्यक्ष, जेएटीएफ जीतो अपैक्स )

“विजय भंडारी आणि इंदर जैन या दोन पुणेकरांची जीतो च्या राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पदावर नियुक्ती होणे ही अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. जीतो पुणेच्या माध्यमातून या दोघांनी अतिशय चांगले काम केले. संपूर्ण जीतो परिवारात या दोघांच्या नेतृत्वाखाली झालेले काम विशेष उल्लेखनीय होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळणे आवश्यक होते. आणि ती मिळाली. याचा जीतो पुणे परिवाराला आनंद आहे. यापुढच्या काळात विजय भंडारी आणि इंदर जैन यांच्या माध्यमातून पुण्यात हॉस्टेल आणि इतर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जावेत ही अपेक्षा आहे.”

– राजेश सांकला (प्रमुख, सिद्धीविनायक ग्रुप)

“जीतो पुणेचे विजय भंडारी व इंदर जैन हे दोन कोहिनूर आहेत. आता ते फक्त पुणे आणि महाराष्ट्राचे राहिले नसून सर्वांचे झाले आहेत. जीतोच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ते काम करणार आहेत. उद्योजक म्हणून ते दोघेही यशस्वी आहेतच तसेच ते धार्मिक कार्यात देखील सक्रिय आहेत. येणाऱ्या काळात हे दोघेही त्यांच्या कार्यातून पुण्याचे नाव रोशन करतील हा मला विश्वास आहे.”

– ॲड. एस. के. जैन (प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ)

“दूरदृष्टी असलेले आणि पुण्याचा अभिमान असलेल्या विजय भंडारी व इंदर जैन यांची जीतो च्या राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. दोघांचा अनुभव, त्यांचा आवाका पाहता ते अतिशय चांगले काम करतील. आणि जीतो च्या कामाला नवी दिशा देतील. त्यांच्या कार्यकाळात जीतोच्या माध्यमातून अधिक व्यापक व समाजोपयोगी कामे होतील असा मला विश्वास आहे.”

– कांतिलाल ओसवाल ( माजी अध्यक्ष, जीतो अपैक्स )

“प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता असते. महत्वाचं असतं ते त्यांना व्यासपीठ मिळणे. दुसरं म्हणजे मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला पाहिजे. स्वप्न ही मोठीच बघितली पाहिजेत तरच आपली कामे देखील मोठी होतात. विजय भंडारी आणि इंदर जैन ही दोन कर्तृत्ववान माणसं राष्ट्रीय स्तरावर कामासाठी सज्ज झाली आहेत. आता आपल्यासमोर यांच्यानंतरची पुढची फळी तयार करण्याचे आव्हान आहे आणि आपण त्यासाठी काम केले पाहिजे. आपण सर्वजण मिळून काम करू आणि विजय भंडारी व इंदर जैन यांना सर्वोत्तम काम उभारण्यासाठी साथ देऊ.”

– शांतीलाल मुथा ( संस्थापक, भारतीय जैन संघटना )

“जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीकडे व्यवहार, संस्कार, परिवार आणि व्यापार पाहिजे. आणि या सर्व गोष्टी विजय भंडारी आणि इंदर जैन यांच्याकडे पाहिल्यावर दिसतात. हे दोघेही अजातशत्रू आहेत. त्यांच्या आहारात सत्व आहे. वागण्यात ममत्व आहे आणि त्यांना जीवनाचं महत्व समजलं आहे. त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वीपणे सुरु आहे.”

– द्वारका जालान ( लायन्स क्लब )

“विजय भंडारी व इंदर जैन हे दोन्ही आपले हिरो आहेत. नेतृत्व तयार करण्याची फॅक्टरी म्हणजे विजय भंडारी होय. जीतो, लायन्स, युगल धर्म संघ अशा अनेक संस्थांवर काम करीत असताना विजय भंडारी यांनी अनेकांना कामाची संधी दिली आणि नेतृत्वाची फळीच तयार केली. आता राष्ट्रीय स्तरावर मोठे कार्य करण्यासाठी विजय भंडारी व इंदर जैन यांना संधी मिळाली आहे. आता त्यांच्या हातून मोठे कार्य होवो. त्यासाठी आम्ही सोबत असू.”

– अचल जैन ( माजी अध्यक्ष, जीतो पुणे )

“विजय भंडारी व इंदर जैन खूप चांगले काम करत आहेत. जीतो ला उच्च स्थानावर नेण्याचं काम हे दोघे करतील. उद्योग व व्यापारात जीतोच्या माध्यमातून सपोर्ट सिस्टीम उभी करण्याचे काम या दोघांनी करावे ही माझी अपेक्षा आहे.”

– रवींद्र सांकला ( प्रमुख, रविराज ग्रुप )

“जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेतृत्व केले पाहिजे आणि ते नेतृत्व प्रयोगशील असले पाहिजे. या सर्व बाबी विजय भंडारी यांच्यामध्ये आहेत. त्यांच्यामुळे जीतोला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम होईलच. परंतु, लायन्स क्लबला देखील त्यांच्या कार्याचा उपयोग होईल.”

– राज मुच्छाल (लायन्स क्लब)

“विजय भंडारी व इंदर जैन यांचे नेतृत्व आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे अनेक स्तरावर कार्यरत असलेल्या दुसऱ्या फळीतील व्यक्तींना काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. त्यांच्यामुळे नवीन पिढी तयार होत आहे आणि त्यांची कामे यशस्वी होत आहे. यापुढील काळातही नवीन पिढीला त्यांचे मार्गदर्शन मिळत राहो.”

– प्रियांका परमार ( संचालक, जीतो अपैक्स )

“राष्ट्रीय स्तरावर जीतोच्या माध्यमातून काम करण्यासाठी आपल्या पुण्यातील दोन महानुभाव गेले आहेत. विजय भंडारी व इंदर जैन यांची निवड ही योग्यच आहे. भारत देशात जीतो ही आता मोठी संघटना म्हणून स्थापित झाली आहे. भंडारी व जैन यांना आपण पुण्यातील सर्वजण मिळून साथ देऊ आणि चांगले काम उभा करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू.”

– इंदर छाजेड (अध्यक्ष, जीतो पुणे )

“पुण्याच्या दोन व्यक्तिमत्वांची जीतोच्या सर्वोच्च पदावर काम करण्यासाठी निवड झालीय. ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे. त्यांच्या हातून मोठं काम व्हावं. त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत.”

– विलास राठोड ( पुणे सकल जैन संघ )

“विजय भंडारी व इंदर जैन हे दोघेही प्रोफेशनल आहेत. शांतपणे उत्तम काम करण्याची इंदर जैन यांची पद्धत आहे. तर, विजय भंडारी म्हणजे कामाचा झंझावात आहे. अनेकांना त्यांच्यातील ऊर्जा वापरण्याची संधी देण्याचे काम विजय भंडारी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावर हे दोन्ही मान्यवर काम करणार आहेत. पुण्यासाठी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला अभिमान वाटेल असं काम देश पातळीवर होईल हा विश्वास वाटतो. त्यासाठी आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहोत.”

– मनोज छाजेड ( सिद्धी फाउंडेशन )

“युगल धर्म संघात सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम विजय भंडारी करीत आहेत. दूरदृष्टी असलेले हे नेतृत्व आहे. प्रचंड काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात आहे. काम यशस्वी करण्यासाठीचे उत्तम नियोजन व त्यासाठीची अंमलबजावणी कशी करायची हे विजय भंडारी यांच्याकडून शिकायला मिळते. विजय भंडारी व इंदर जैन यांच्यामुळे जीतोच्या कामाचा नावलौकिक आणखी उचीवर जाईल यात शंका नाही.”

– मंगेश कटारिया ( युगल धर्म संघ )

“जीतो संघटना विश्वव्यापी होत आहे. संघटनेची ताकद वाढते आहे. आणि अशा काळात पुण्याचे आपले दोन हिरे राष्ट्रीय स्तरावर काम करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून पुण्यात जीतोची शाळा आणि समाजासाठी मोठं सभागृह होण्याची आवश्यकता वाटते.”

– राजेंद्र बाठिया ( माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर )

Leave a Comment