कॅम्प एज्युकेशन सोसायटी ही १४२ वर्षे शैक्षणिक वारसा लाभलेली पुण्यातील एकमेव संस्था आहे. गेली १४२ वर्षे संस्था अविरतपणे शिक्षण दानाचे महान कार्य करीत आहे. पुण्यातील कॅम्प, रास्ता पेठ, निगडी, चिंचवड, मोशी येथे संस्थेचे विभाग कार्यरत आहे. कोरेगाव भीमा येथे संस्था ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटीची वालचंद दे. संचेती शाळा’ शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ पासुन पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक (इयत्ता १ ली ते १२ वी) विभाग सुरू करीत आहे.
सदर शाळेच्या अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त अशा इमारतीची पाहणी करण्याकरिता संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.वालचंद संचेती, मानद सचिव श्री. बाबुराव जवळेकर, खजिनदार श्री सुभाष अगरवाल, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ.आय.एस.मुल्ला, डॉ .प्रवदा तेलंग, श्री.विजय मुथा, श्री.दीपेश संचेती, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री.संदीप ढेरंगे, पंचक्रोशीतील मान्यवर, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक, विद्यार्थी , पालक वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सदर शाळेची भव्यदिव्य व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी वातानुकुलीत इमारत संस्थेकडुन मु.पो. कोरेगाव भीमा, तालुका-शिरूर, जिल्हा -पुणे येथे उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना उच्चप्रतिचे व आधुनिक शिक्षण देणे संस्थेने नेहमीच ध्येय मानले आहे व या ध्येयाशी प्रामाणिक राहून संस्था मार्गक्रमण करीत आहे. कोरेगाव भीमा येथील तसेच आसपासच्या उपनगरातील सर्वस्तरातील पालकांना आपल्या पाल्याला उच्च दर्जाचे शिक्षण देता यावे यासाठी संस्थेने इंग्रजी माध्यमाची CBSE अभ्यासक्रमाची शाळा सुरू करत आहे.
विद्यार्थ्यांसाठी सर्वसोयी सुविधा शाळेतच देण्यात याव्यात यासाठी संस्था प्रयत्नशील राहीली आहे. विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित वर्ग खोल्या, ई-लर्निंग क्लासरूमची सोय, संगणक प्रयोगशाळा, अत्याधुनिक ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा इत्यादी शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. शाळेमध्ये नेमण्यात आलेले शिक्षक अनुभवी व निपुण आहेत. अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेने खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. तसेच बुध्दीबळ, कराटे, स्केटींग, स्विमिंग यासारखे खेळही शाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र तज्ञ शिक्षकांची नेमणुक संस्थेकडुन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील उत्स्फुर्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगीताचे धडेही देण्यात येणार आहेत.
अभ्यासासाठी आजुबाजुचे वातावरणही अतिशय महत्वाचे असल्या कारणाने संस्थेने इमारतही प्रशस्त बांधलेली आहे. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये स्वच्छ सुर्यप्रकाश व नैसर्गिक वारा येण्याचा प्रयत्न केला आहे जेणे करून विद्यार्थी उत्साही वातावरणात अभ्यास करू शकतील विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार मिळावा यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांच्या जेवणाची देखील सोय केली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ व निरमळ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी फिल्टर व कुलर वसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेने कोरेगाव भीमा येथे शाळेचे दालन उघडलेले आहे.