केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे रक्तदान व आरोग्य शिबिर सम्पन्न झाले !
पुणे, पुण्याचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी – जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच यांच्या वतीने पुष्पा हाईट, पुष्पमंगल चौक, पुणे येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. २३८ बॉटल रक्तसंकलन करण्यात आले आहे.