पुणे, २१ जुलै रोजी ‘डॉक्टर डे’ निमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. समाजात विविध वैद्यकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा देणाऱ्या ११ डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हे सर्व डॉक्टर आपल्या कार्यकुशलतेद्वारे समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र झटत असून, त्यांच्या सेवेचे मोल अनमोल आहे.
याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ.जितेंद्र लोढा,डॉ.जनार्दन गार्डे,डॉ.अशोक संचेती,डॉ.स्नेहल पाडळे,डॉ. विजय शेठिया,डॉ.महेश साबळे,डॉ.जितल संचेती,डॉ.विलास काळे,डॉ.विनोद पाटील,डॉ.सुनील होनराव अशा या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला

याप्रसंगी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी आपले विचार व्यक्त करत सांगितले की, “डॉक्टर म्हणजेच खऱ्या अर्थाने जीव वाचवणारा देवदूत. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरही डॉक्टरांनी दिलेली सेवा ही प्रेरणादायक आहे. समाजाने त्यांच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे.” कार्यक्रमाच्या आयोजनातून डॉक्टरांच्या योगदानाला दिलेली ही पावती समाजाला त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावते. या उपक्रमामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ.जितेंद्र लोढा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “डॉक्टर डे निमित्त असा सन्मान मिळणे हे केवळ सन्मान नसून जबाबदारीची जाणीव देखील करून देणारे आहे. आपण समाजाच्या विश्वासाला पात्र ठरावे यासाठी अधिक सजग राहण्याची प्रेरणा अशा उपक्रमांतून मिळते.” त्यांनी पुढे सांगितले की, वैद्यकीय सेवा ही केवळ पेशा नसून ती एक धर्म आहे आणि प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच खरे समाधान देते.
याप्रसंगी नगरसेवक प्रवीण चोरबेले,अनिल भन्साळी, राजेंद्र सरदेशपांडे,शिवा केगारें,सावंन बनसोडे, किशोर मेगावत, आकाश डोंपरे,आनंद बनसोडे, अमित माशाळे,आयुष चोरबेले यांच्या सह प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.